महाराष्ट्रातील होलार समाजाने जात वैधता प्रमाणपत्रासाठी प्रत्येक जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीला प्रस्ताव सादर करावे. या शैक्षणिक वर्षात व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षेचे माध्यमातून आरक्षित जागेवर प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या व अद्याप ज्यांनी जातवैधता प्रमाणपत्राकरिता आपले प्रस्ताव समितीस सादर केलेले नाहीत अशा मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी आपले प्रस्ताव समिती कार्यालयास सादर करावेत. तसेच आजअखेर ज्या मागासवर्गीय विद्यार्थी / अर्जदारांनी समितीकडे जातपडताळणी प्रमाणपत्रासाठी अर्ज केला आहे परंतु अद्याप वैधता प्रमाणपत्र मिळाले नाही, अथवा ज्या अर्जदारांचे प्रकरण त्रुटीयुक्त आहे अशा सर्व विद्यार्थी / अर्जदारांनी होलार समाज सामाजिक संस्था, पुणे नोंदणीकृत संस्थेसी संपर्क साधावा असे आवाहन श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे संस्थापक अध्यक्ष यांनी केले आहे.मो.7972140451
Featured Post
