महाराष्ट्रातील होलार समाज लाभार्थ्यांनी लीडकॉम महामंडळाकडे व्यवसायासाठी अर्थसहाय्यासाठी 50 हजार ते 50 लाखापर्यंतचे केलेले अर्ज लाभार्थ्याच्या नावाने काढले जाणार चेक. मा. धम्मज्योती गजभिये साहेब व्यवस्थापकीय संचालक यांनी दिले आदेशाने. श्री नामदेवराव श्रीरंग आयवळे यांच्या अथक प्रयत्नातून सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे. मा. धम्मज्योती गजभिये साहेब व्यवस्थापकीय लीडकॉम मुंबई यांच्या अध्यक्षतेखाली होलार समाज सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य संस्थेचे संचालक मंडळ उपस्थित मान्यवर यांच्यासमवेत मंगळवार दिनांक 20/ 2 / 2024 रोजी बैठकीमध्ये महाराष्ट्रातील होलार समाजाला न्याय मिळण्याबाबत मागणी केली तसेच महाराष्ट्रातील होलार समाजाने व्यवसायासाठी पन्नास हजार ते 50 लाखापर्यंतचे लीड कॉमकडे अर्ज प्राप्त झालेले अर्ज मंजूर करून लाभार्थ्यांच्या नावाने चेक काढावेत. तसेच काही जाचक अटी शितल कराव्यात . तसेच प्रत्येक जिल्ह्याचे व्यवस्थापक यांना पत्रक काढून होलार समाजाचे कर्ज प्रकरण अर्जांची यादी आपल्या स्तरावरून मागून घेतली जावी. तसेच ज्यांची कागदपत्रे पूर्ण प्राप्त झाली आहेत असे अर्ज व काही पेंटिंग राहिलेली अर्ज लाभार्थ्याच्या नावाने चेक काढले जावेत. अशा मागण्या करण्यात आल्या. तसेच महाराष्ट्र राज्य छत्रपती शिवाजी महाराज पेशवा, ब्रिटिश ,आणि मुघल, काळापासून आणि सृष्टी निर्माण झाल्यापासून महाराष्ट्र राज्यात होलार समाज राहत आहे हा समाज भूमिहीन समाज आहे या समाजाचा मूळ रोजगार वाद्य वाजविणे जुन्या चप्पल दुरुस्त करणे आणि आपल्या पोटाची खळगी भरणे पूर्वजांचा व्यवसाय करीत आहेत. तसेच अत्यंत मागासलेला समाज या समाजातील शैक्षणिक प्रगती अजूनही पुरेशी झालेली नाही म्हणून या समाजात जास्तीत जास्त अर्थसहाय्य दिले जावेत . अशी मागणी शिस्त मंडळांनी केली त्यावेळी अण्णा पाटील ,जगन्नाथ पारसे, मारुती कांबळे, सचिन करडे, संस्थेचे संचालक मंडळ व संस्थेचे संस्थापक अध्यक्ष नामदेव श्रीरंग आयवळे यांच्या उपस्थितीत मीटिंग संपन्न झाली
Featured Post
