नोंदणी क्र. F-53452 पुणे, महाराष्ट्र राज्य. आय.एस्.ओ. 9001-2015 प्रमाणित संस्था.
मा. श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे, यांना मिळालेले पुरस्कार व सन्मानपत्र..




..... संस्थेने स्थापन केलेल्या "राजमाता जिजाऊ महिला बचत गट" तर्फे संचलित "महिला लघुउद्योग" सुरू करण्यात आली असून, ज्या समाज बांधवांना व्यवसाय सुरू करायचा आहे, त्यांनी संस्थेशी संपर्क साधावा. होलार समाज सामाजिक संस्था UPSC / MPSC ची तयारी करीत असलेल्या विद्यार्थ्यांना मोफत आॅनलाईन मार्गदर्शन केले जात असून, प्रत्येक शनिवारी व रविवारी दुपारी ठीक. 2 ते 4 वाजेपर्यंत असते, "मान्यवर शिक्षक" मार्गदर्शन करतात, तरी विद्यार्थी वर्गाने उपस्थित राहून मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा व आॅनलाईन उपस्थित राहण्यासाठी त्यांनी संस्थेशी संपर्क साधावा.

  

मा. सुनील वारे सर महासंचालक डॉ. बाबासाहेब आंबेडकर बार्टी पुणे. यांच्याकडे सतत पाठपुरावा करून होलार समाज सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री नामदेवराव श्रीरंग आयवळे यांच्या पुढाकाराने विशेष मोहीम महाराष्ट्रातील होलार समाजाला जातीचे प्रमाणपत्र व जातीचे वैधता प्रमाणपत्र देण्याचे बार्टीचे महासंचालक यांनी दिले आदेश प्रत्येक जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीना प्रत्येक जिल्हा तालुक्याच्या ठिकाणी शिबिरे घेऊन जात प्रमाणपत्र देण्यात यावे तसेच महाराष्ट्रातील होलार समाजाच्या जातीच्या चुकीच्या झालेल्या नोंदी व जातीचे प्रमाणपत्र, जातीचे वैधता प्रमाणपत्र मिळण्याकरिता त्यांनी होलार समाज सामाजिक संस्थेसी संपर्क साधावा. वरील अडचणीमुळे होलार समाजाला कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घेता आलेला नाही. होलार समाजाचा सामाजिक, आर्थिक, व सर्वागीण विकास व्हावा शासनाच्या विविध योजनेचा लाभ मिळावा जातीचे प्रमाणपत्र जातीचे वैधता प्रमाणपत्र विशेष मोहीम राबवून देण्यात यावा तसेच होलार समाजाला येणार्‍या अडचणी शैक्षणिक बाबीकडे झालेले दुर्लक्ष व शिक्षणातील गळतीचे प्रमाण, जातीचे अस्तित्व, जातीच्या चुकीच्या नोंदी संदर्भात तसेच स्त्रियांचे स्थान होलार व होलेर माताग सुतार ,धनगर या मधील अडचणी होलार समाजाला जात प्रमाणपत्र व जात पडताळणी प्रमाणपत्र मिळण्यासाठी येणार्‍या अडचणी शासकीय योजनेचा माहितीचा अभाव तसेच समाज कल्याण विभागाच्या विविध योजनेची माहिती तळागाळापर्यंत पोहोचली जात नाहीये शिक्षणाचा अभाव उत्पन्नाच्या साधनांचा अभाव रूढी परंपरेचा पगडा व समाजातील आर्थिक दुर्बल लोकांसाठी ठोस अश्या उपाययोजना नाहीत, वेळेवर उपचार, सरकारी मदत उपलब्ध होत नाही, अत्याचार ग्रस्त समाज बांधवांना योग्य तो न्याय मिळत नाही. हे होलार समाजाचे मूलभूत प्रश्न आहेत व हेच प्रश्न सोडवण्यासाठी होलार समाजाचे प्रेरणास्थान श्री भगवान हरिबा जावीर गुरुजी व दत्तात्रय करडे संस्थेचे प्रवक्ते बबन करडे संस्थेचे सल्लागार अर्जुन खांडेकर सचिव जगन्नाथ पारसे खजिनदार तसेच सर्व सदस्य यांच्या सहकार्याने हे प्रश्न सोडवले जात आहेत याची समाज बांधवांनी नोंद घ्यावी. आपला विश्वासू श्री नामदेवराव श्रीरंग आयवळे संस्थापक अध्यक्ष.

Featured Post

 

About Me

होलार समाज सामाजिक संस्था, पुणे

Popular Posts