एक ऐतिहासिक कार्यक्रमासाठी सज्ज व्हा!2024" नवीन वर्ष. समाजाचे हक्काचे व्यासपीठ. मा.सुनील वारे साहेब. महासंचालक डॉ. बाबासाहेब आंबेडकर (बार्टी), पुणे व महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय विशेष विभाग, यांचे आदेशाने, श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे संस्थापक अध्यक्ष होलार समाज सामाजिक संस्था ,पुणे. यांच्या अथक प्रयत्नाने तसेच श्री. भगवान जावीर गुरुजी प्रेरणास्थान श्री. दत्तात्रय करडे प्रवक्ते श्री. बबन करडे सल्लागार श्री. अर्जुन खांडेकर सचिव श्री. जगन्नाथ पारसे खजिनदार यांचे मोलाचे सहकार्याने होलार समाजाचा सामाजिक, आर्थिक व सर्वागीण विकास व्हावा, महाराष्ट्रातील होलार समाजाच्या जातीच्या चुकीच्या झालेल्या नोंदीमुळे होलार समाजाला जातीचे प्रमाणपत्र व जातीचे वैधता प्रमाणपत्र मिळण्याकरिता येत असलेल्या अडचणी मुळे होलार समाजाला कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घेता येत नाही. होलार समाजाच्या जात प्रमाणपत्राबाबत अडचणी सोडवण्यासाठी संस्थेने सतत पाठपुरावा केल्यामुळे आता प्रत्येक जिल्हा तालुका गावपातळीवर कार्यशाळा घेऊन जातीचे प्रमाणपत्र दिले जाणार. उपस्थितीत. १)जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती अध्यक्ष सचिव व सदस्य. २)उपविभागीय अधिकारी. (महसूल), विभाग जिल्हा सर्व . ३) जिल्ह्यातील सर्व तहसीलदार यांच्या उपस्थितीत होलार समाजातील जे जात प्रमाणपत्र जात वैधता प्रमाणपत्रापासून जे वंचित आहेत त्यांना वेळेत व सुलभ रीतीने जात प्रमाणपत्र दिले जाणार. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती. भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास वर्ग जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्यांच्या पडताळणीचे विनिमयम) अधिनियम 2000 आणि त्यानुसार तयार केलेले नेम 2012 अन्याये व रक्तनाते संबंधातील वैधता प्रमाणपत्र संदर्भात 24 नोव्हेंबर 2017 च्या अनुसूचनेनुसार तसेच शासनाकडून वेळोवेळी निर्गमित होणारे शासन निर्णय, याबाबत आपले स्तरावरून स्थानिक पातळीवर विशेष मोहीम राबवून उपलब्ध करून होलार समाजाला जातीचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत. आपला विश्वासू तुमच्या आमच्या हक्काचा माणूस नामदेवराव श्रीरंग आयवळे
Popular Posts
-
-
होलार समाजाच्या सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक प्रगतीसाठी सातत्याने कार्यरत असलेली होलार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य, ही ISO 9001:2015 आंतरराष्ट्रीय गुणवत्ता व्यवस्थापन प्रणाली मानांकन प्राप्त संस्था असून समाजासाठी आशेचा किरण ठरत आहे. श्री.बबनराव करडे मा. नायब तहसीलदार सातारा तथा संस्थेचे सल्लागार यांच्या सल्ल्याने. अँड.जि.एन.ऐवळे संस्थेचे कायदेतज्ञ सल्लागार यांच्या सहकार्याने. समाजाच्या न्याय-हक्कांसाठी शासन व प्रशासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करणे, समाजाच्या अडचणी ओळखून वास्तववादी उपक्रम राबवणे, हे या संस्थेचे वैशिष्ट्य असून त्यामुळेच ही संस्था समाजात एकमेव दिशादर्शक म्हणून ओळखली जाते. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे यांनी होलार समाजातील विविध प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी अथक प्रयत्न केले आहेत. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे समाजातील हजारो युवकांना विविध शासकीय योजनांच्या अनुदानित प्रशिक्षणांचा आणि सुविधा योजनांचा मोठ्या प्रमाणात लाभ मिळत असून अनेक कुटुंबांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडला आहे. शाहू, फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कृतिशील विचारांचा वारसा माझ्या कार्याचा आधार आहे. हा वारसाच मला समाजासाठी काम करण्याची ऊर्जा देतो. लोकांच्या दैनंदिन आयुष्यातील प्रश्न हे माझ्या कामाचे सदैव केंद्रबिंदू राहिले आहेत. समाजातील युवकांना रोजगार उपलब्ध करून देणे, महिलांचे सबलीकरण, जनतेपर्यंत शासकीय सुविधा पोहोचवणे, विकासकामांचा पाठपुरावा करणे, महिलांसाठी बचत गट व व्यवसाय प्रशिक्षण, जात प्रमाणपत्र व जातीवैधता प्रमाणपत्राबाबत मदत, तसेच चुकीच्या नोंदींमुळे येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी मार्गदर्शन — अशा अनेक क्षेत्रांत संस्था सातत्याने कार्यरत आहे. तसेच समाजातील युवक-युवतींना कौशल्यविकास प्रशिक्षण देऊन उद्योग व लघुउद्योग सुरू करण्यास प्रोत्साहन देणे हेही संस्थेचे एक महत्त्वाचे ध्येय आहे. आपल्या सर्वांच्या सहकार्याने हे कार्य करण्याची मला एक संधी मिळत आहे त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.
-