नोंदणी क्र. F-53452 पुणे, महाराष्ट्र राज्य. आय.एस्.ओ. 9001-2015 प्रमाणित संस्था.
मा. श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे, यांना मिळालेले पुरस्कार व सन्मानपत्र..




..... महिला सशक्तीकरण अभियान, स्पर्धा परीक्षा अभियान, युवक विकास अभियान व जात प्रमाणपत्र व जात पडताळणी अभियान शासकीय मार्गदर्शन व मदत होलार समाज सामाजिक संस्था UPSC / MPSC ची तयारी करीत असलेल्या विद्यार्थ्यांना मोफत आॅनलाईन मार्गदर्शन केले जात असून, प्रत्येक शनिवारी व रविवारी दुपारी ठीक. 2 ते 4 वाजेपर्यंत असते, "मान्यवर शिक्षक" मार्गदर्शन करतात, तरी विद्यार्थी वर्गाने उपस्थित राहून मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा व आॅनलाईन उपस्थित राहण्यासाठी त्यांनी संस्थेशी संपर्क साधावा.

  

मा. धम्म ज्योती गजभिये साहेब व्यवस्थापकीय संचालक यांच्या आदेशाने. संत रोहिदास चर्मोउद्योग विकास महामंडळाची नियोजन बैठक. होलार समाज सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष नामदेवराव श्रीरंग आयवळे यांच्या अथक प्रयत्नाने सोलापूर येथे डॉ .बाबासाहेब आंबेडकर सामाजिक व संस्कृतीक न्याय भवन, 2 मजला, शासकीय विश्रामग्रहाच्या मागे शोभानगर सोलापूर येथे दिनांक 16 नोव्हेंबर 2023 रोजी वेळ दुपारी ठीक 12 वाजता बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. १) संत रोहिदास चर्मोउद्योग महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनेची माहिती व महामंडळाचे अंतर्गत संत रोहिदास चर्मउद्योग व चर्मकार विकास महामंडळमार्फत राबविण्यात येणारे योजनेमधून आर्थिक लाभ मिळण्यास सर्वसाधारण आवश्यक असणाऱ्या बाबी :- याचा मार्गदर्शन. २) सोबत जोडण्याची कागदपत्रे. ३) व्यवसायासाठी अर्थसाह्य मिळण्याकरता अर्ज करण्याची पद्धती: ४) अर्ज प्राप्त झाल्यानंतर महामंडळामार्फत करावयाची कार्यवाही: ५) संत रोहिदास महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या राज्य शासनाच्या योजना: ६) बीज भांडवल योजना: ७) प्रशिक्षण योजना: सदर योजनेअंतर्गत महामंडळामार्फत सुशिक्षित बेरोजगार युवकांना प्रशिक्षण देण्यात येते. ८) गटई स्टॉल योजना: रस्त्याच्या कडेला काम करणाऱ्या कारागिरांना गटई स्टॉल पुरवण्याची योजना योज100% अनुदान तत्त्वावर आयुक्त समाज कल्याण पुणे या महामंडळामार्फत स्विक्तपणे राबविण्यात येते. ९) राष्ट्रीय अनुसूचित जाती वित्त व विकास महामंडळ (एन. एस. एफ. डी .सी.). नवी दिल्ली यांच्या योजनांची माहिती. १०) सूक्ष्म पत पुरवठा योजना : या योजनेअंतर्गत होलार, चांभार ,मोची, ढोर , समाजातील लाभार्थ्यांना पाच टक्के व्याज दराने पन्नास हजार पर्यंत अर्थसहाय्य दिले जाते. या रकमेमध्ये रु १०.०००/-अनुदान दिले जाते व उर्वरित रक्कम रु.४०.०००/-कर्ज म्हणून दिले जाते. ११) महिला समृद्धी योजना: होलार समाजातील सर्व महिला लाभार्थ्यांसाठी महिला समृद्धी योजना अंतर्गत कर्ज रक्कम रु.४०.०००/- व अनुदान रु.१०.०००/- असे दोन्ही मिळून रू.५०.००० /-पर्यंत ,४ टक्के व्याज दराने कर्ज देण्यात येते. १२) महिला किसान योजना: १३) शैक्षणिक कर्ज योजना : १४) आवाहन: वरील योजनेचा गरजवंतांनी लाभ घ्यावा. होलार समाजातील गरजू लाभार्थ्यांच्या समक्ष सोडवण्यासाठी व जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी अर्ज करावीत यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे संस्थेच्या वतीने सोलापूर जिल्ह्यातील होलार समाजातील ज्या नागरिकांना संत रोहिदास विकास महामंडळाच्या विविध योजनेचा लाभ गरजवंतानी या बैठकीला उपस्थित राहावे अशा प्रकारचे आव्हान संस्थेचे संस्थापक अध्यक्ष नामदेवराव श्रीरंग आयवळे व भगवान हरिबा जावीर गुरुजी व अर्जुन खांडेकर व जगन्नाथ पारसे यांनी केली आहे. आपला विश्वास तुमच्या आमच्या हक्काचा माणूस नामदेवराव श्रीरंग आयवळे संपर्क ९७ ६४ ९६ ९०७४

Featured Post

📢━━━━━━━━━━━━━━━━━━━📢 **जात पडताळणी मार्गदर्शन** ━━━━━━━━━━━━━━━━━━━ ❗ **आडनाव / नोंद चुकीची आहे? घाबरू नका!** योग्य कागदपत्रे दिल्यास जात पडताळणी नक्की होते ✅ 🔟 **महत्त्वाचे मुद्दे:** 🔹 १९५० पूर्वीचे पुरावे खूप महत्त्वाचे 🔹 वंशावळ (Family Tree) तयार करून जोडा 🔹 आडनाव फरकासाठी शपथपत्र (Affidavit) द्या 🔹 नातेवाईकांचे जात प्रमाणपत्र जोडा 🔹 जुन्या शाळेचे दाखले शोधा 🔹 ७/१२, जन्म, मृत्यू, मतदार यादी जोडा 🔹 शब्दलेखन फरक स्पष्ट करा 🔹 प्रमाणित प्रती (Certified Copies) वापरा 🔹 अर्ज पूर्ण आणि अचूक भरा 🔹 अनुभवी मार्गदर्शन घ्या 📌 **लक्षात ठेवा:** ➡️ नाते संबंध स्पष्ट असणे सर्वात महत्त्वाचे ➡️ कागदपत्रे व्यवस्थित असतील तर प्रक्रिया सोपी होते ━━━━━━━━━━━━━━━━━━━ 🏛 **होलार समाज सामाजिक संस्था** (महाराष्ट्र राज्य, पुणे) 👤 **संस्थापक अध्यक्ष:** नामदेव आयवळे 📞 **संपर्क:** 9764969074 💬 अडचण असल्यास ग्रुपवर विचारणा करा ✍️ **मार्गदर्शक:** श्री. बबनराव करडे *(मा. नायब तहसीलदार, सल्लागार)* ━━━━━━━━━━━━━━━━━━━ 📢 *ही माहिती गरजूंना नक्की शेअर करा!*

About Me

होलार समाज सामाजिक संस्था, पुणे

Popular Posts