नोंदणी क्र. F-53452 पुणे, महाराष्ट्र राज्य. आय.एस्.ओ. 9001-2015 प्रमाणित संस्था.
मा. श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे, यांना मिळालेले पुरस्कार व सन्मानपत्र..




..... संस्थेने स्थापन केलेल्या "राजमाता जिजाऊ महिला बचत गट" तर्फे संचलित "महिला लघुउद्योग" सुरू करण्यात आली असून, ज्या समाज बांधवांना व्यवसाय सुरू करायचा आहे, त्यांनी संस्थेशी संपर्क साधावा. होलार समाज सामाजिक संस्था UPSC / MPSC ची तयारी करीत असलेल्या विद्यार्थ्यांना मोफत आॅनलाईन मार्गदर्शन केले जात असून, प्रत्येक शनिवारी व रविवारी दुपारी ठीक. 2 ते 4 वाजेपर्यंत असते, "मान्यवर शिक्षक" मार्गदर्शन करतात, तरी विद्यार्थी वर्गाने उपस्थित राहून मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा व आॅनलाईन उपस्थित राहण्यासाठी त्यांनी संस्थेशी संपर्क साधावा.

  

होलार समाज सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य या संस्थेच्या वतीने दिनांक 16 नोव्हेंबर 2023 रोजी वेळ दुपारी बारा वाजता संस्थेचे अध्यक्ष श्री नामदेवराव श्रीरंग आयवळे यांच्या अथक प्रयत्नाने रोहिदास चर्मोउद्योग विकास महामंडळ व डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन बार्टी सोलापूर येथे सामाजिक व सांस्कृतिक न्याय भवन येथे सौ. बार्टीचे प्रणिता कांबळे प्रकल्प अधिकारी सोलापूर तसेच चर्मकार विकास महामंडळाचे अविनाश चाबुकस्वार अधिकारी यांच्याबरोबर बैठक संपन्न झाली . त्यावेळी संत रोहिदास चर्मोउद्योग व चर्मकार विकास महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजना मार्गदर्शन अधिकारी यांनी केले तसेच होलार समाजातील तरुणांना उद्योगाला लागणारी अर्थसहाय्य महामंडळाच्या माध्यमातून मिळण्याकरता जास्तीत जास्त अर्ज केले पाहिजे व काही अडचणी आल्यास नामदेवराव आवळे यांच्याशी संपर्क साधावा असे आव्हान केले. तसेच बार्टीचे प्रणिता कांबळे प्रकल्प अधिकारी यांनी अतिशय महत्वाचे समाजमार्गदर्शन करुन समाज बांधवांची मनी जिंकली. तसेच समाज्यातील तरूणांना उध्योगाला लागणारे अर्थ सहाय्य कसे मिळवायचे यावर विस्तृत चर्चा करण्यात आली यावर सोलापूर येथील महामंडळाचे प्रमुख यांनी समाधान कारक मार्गदर्शन केले लवकर कसे मंजूर करता येईल आणि उधोगाला लागायचे हा मार्ग त्यांनी सांगितला आहे यावेळी होलार समाज्यातील हे मान्यवर उपस्थीत होते. श्रीरंग केंगार, तानाजीराव भडंगे, बबनराव करडे शिवाजीराव जावीर, साहेब सदाशिव ऐवळे, रघुनाथ ऐवळे, विट्ठल गेजगे, सिताराम ऐवळे, महादेव पारसे, जगनाथ पारसे, वगसिद्ध गायकवाड आदी मान्यवर उपस्थीत होते तसेच होलार समाज सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य ही संस्था प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशाच बैठका घेऊन समाज बांधवांना जास्तीत जास्त अर्थसहाय मिळवून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहे त्याचा लाभ सर्व समाज बांधवांनी घ्यावा ही नम्र विनंती आपला विश्वासू तुमच्या आमच्या हक्काचा माणूस श्री नामदेवराव श्रीरंग आयवळे पुणे संपर्क ९७६४९६९०७४

Featured Post

 

About Me

होलार समाज सामाजिक संस्था, पुणे

Popular Posts