*बार्टी च्या कौशल्य विकास विभागा अंतर्गत अनुसूचित जातीमधील ५०० युवक-युवतींसाठी Tata STRIVE मार्फत पुणे,नाशिक,नागपूर,ठाणे,मुंबई येथे मोफत प्रशिक्षणाची सुवर्णसंधी* *!!! दि. १९ ऑक्टोबर २०२३ पासून नाव नोंदणी करता येईल !!!* डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी, पुणे आणि टाटा कम्युनिटी इनिशिएटिव्ह ट्रस्ट (Tata STRIVE) यांच्या संयुक्त विद्यमाने कौशल्य विकास विभागा मार्फत सन २०२३-२४ या वर्षात विविध अनिवासी प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्याचे असून त्या अनुषंगाने दिनांक ०४/०८/२०२३ रोजी मुंबई येथे सामंजस्य करार करण्यात आला होता सदर सामंजस्य करारा अंतर्गत पुणे व पुणे (नऱ्हे), नाशिक, नागपूर, ठाणे, मुंबई, तळोजा इत्यादी ठिकाणी प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. बार्टी च्या कौशल्य विकास विभागा अंतर्गत अनुसूचित जातीमधील ५०० युवक-युवतींसाठी हि मोफत प्रशिक्षणाची सुवर्णसंधी आहे . *प्रशिक्षणासाठी उपलब्ध कोर्सेस पुढील प्रमाने आहेत -* Business Development Executive , Auto Sales Consultant , Customer Care Executive, Cyber Security ,Front Office Associate, Retail Sales Associates ,Assistant Electrician , Assistant Beauty Therapist (Only for females) , General Duty Assistant, Quick Service Restaurant Executive , Automotive Service Technician (2 -Wheeler),Automotive Service Technician (4-Wheeler),Food & Beverage Service - Steward, Housekeeping Operations , Field Technician AC ,Automotive Tele-Caller, UX Design, Field officer Agri ,Solar PV Installer , AC&R Operator (Central AC) . *रजिस्टर लिंक :-* https://rb.gy/kra7b *नाव नोंदणी :-* दि. १९ ऑक्टोबर २०२३ पासून *नाव नोंदणीची शेवटची तारीख :-* ३१ ऑक्टोबर २०२३ *प्रशिक्षणाचे इतर फायदे :-* इंग्रजी भाषेचे प्रशिक्षण ,व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षण , कंप्युटर व उद्योजकीय प्रशिक्षण ,मोफत प्रशिक्षण साहित्य 100% नोकरीसाठी सहाय्य *आवश्यक कागदपत्रे:* •जातीचा दाखला (Caste Certificate) •आधार कार्ड •शैक्षणिक प्रमाणपत्र (मार्कशिट) •शाळा/ महाविद्यालय सोडल्याचा दाखला (TC/LC) •4 पासपोर्ट साईट फोटो •मेडिकल फिटनेस प्रमाणपत्र •रेशन कार्ड •राष्ट्रीयकृत बँकेच्या पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत *प्रशिक्षणासाठी व इतर माहितीसाठी संपर्क क्रमांक .:-* पुणे - 9920934096 , नाशिक - 8698411288 , पुणे नऱ्हे - 7770045454 , मुंबई - 75566611093 , तळोजा - 9920989450 , नागपूर - 9021204499 , ठाणे - 9920191648 *“बार्टी” च्या माध्यमातून अनुसूचित जातीच्या विकासासाठी राबवल्या जात असलेल्या विविध योजनांचा व उपक्रमांचा लाभ समाजातील युवक-युवतींनी जास्तीत जास्त घ्यावा, असे आवाहन बार्टीचे महासंचालक श्री. सुनिल वारे यांनी केले आहे.*
Popular Posts
-
-
होलार समाजासाठी विभागीय कार्यशाळा मोठ्या थाटामाटात संपन्न झाली – छत्रपती संभाजीनगरात बार्टी व होलार समाज संस्थेचा उपक्रम छत्रपती संभाजीनगर, 10 जुलै 2025 – डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अनुसूचित जाती वस्ती सुधार योजना (बार्टी), पुणे व होलार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय विभागीय कार्यशाळेचे आयोजन डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, खोकडपुरा, छत्रपती संभाजीनगर येथे करण्यात आले. ISO 9001:2015 प्रमाणित संस्थांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कार्यशाळेचा मुख्य उद्देश जात प्रमाणपत्र व जात पडताळणी प्रमाणपत्र संदर्भातील अडचणी, बेरोजगारी, उद्योग धोरणे व युवा गट स्थापनेविषयी समाजाला योग्य मार्गदर्शन समाज कल्याण विभागाच्या विविध योजना होलार समाजाच्या सामाजिक आर्थिक आणि शैक्षणिक अडचणी दूर करण्यासाठी सरकार, समाज, आणि स्थानिक प्रशासन यांच्याकडून समन्वय साधून विविध योजनेची अंमलबजावणी करणे हा कार्यशाळेचा उद्देश सामाजिक करणे हा होता. कार्यशाळेची सुरुवात थोर महापुरुषांच्या प्रतिमाचे मान्यवराच्या हस्ते पूजन करण्यात आले प्रमुख या कार्यक्रमासाठी मार्गदर्शक म्हणून बार्टी, पुणेचे अप्पर जिल्हाधिकारी व प्रशिक्षण विभाग प्रमुख, प्रकल्प व्यवस्थापक श्री. नितीन सहारे, सचिन नांदेडकर, संबंधित जिल्ह्यांचे उपविभागीय अधिकारी, कन्नड येथील प्रांत तहसीलदार, महसूल विभागाचे अधिकारी, जिल्हा जात पडताळणी समितीचे सदस्य, समाजकल्याण विभागाचे अधिकारी, तसेच बार्टी संस्थेतील विविध मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक बार्टीचे श्री. नितीनजी सहारे सर यांनी सादर केले. त्यांनी प्रकल्पाच्या उद्देशांबाबत सविस्तर माहिती दिली. बार्टीच्या विविध योजना समजावून सांगितल्या उपविभागीय अधिकारी व तहसीलदार महसूल विभाग यांनी जात प्रमाणपत्र प्रक्रिया व येणाऱ्या अडचणींचे सखोल विश्लेषण केले. जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी प्रक्रियेबाबत जिल्हा जात पडताळणी समिती, छत्रपती संभाजीनगर यांनी मार्गदर्शन केले. होलार समाजाचे संस्थापक अध्यक्ष श्री. नामदेवराव आयवळे यांनी समाजाच्या प्रमुख अडचणी अधिकार्यांच्या समोर प्रभावीपणे मांडल्या. व होलार समाजाच्या विकासासाठी बार्टी पुणे मार्फत विशेषतः विभागीय स्तरावरील स्वतंत्रपणे कार्यशाळा घेतल्या जात इतिहास घडत आहे मा. सुनील वारे महासंचालक यांना व सर्व टीमचे समाज बांधवांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. अनेक समाजबांधवांनी देखील आपले प्रश्न प्रत्यक्षपणे मांडले. या संवादातून अनेक शंका दूर झाल्या व उपाययोजना सुचविण्यात आल्या. कार्यक्रमाचा समारोप व आभारप्रदर्शन श्री. नितीनजी सारे यांनी केले. या कार्यशाळेमुळे होलार समाजातील नागरिकांना प्रशासनाशी थेट संवाद साधता आला तसेच जात पडताळणी आणि रोजगाराच्या संधींबाबत मोलाचे मार्गदर्शन मिळाले सर्व कार्यक्रमाला उपस्थित समाज बांधव पदाधिकारी यांना संस्थेच्या वतीने धन्यवाद
-