Thank you for your message. We're unavailable right now, but will respond as soon as possible. Follow me please http://www.holarsamajsamaiksanstha.blogspot.com http://www.holarsamajssp.blogspot.com महाराष्ट्रातील तमाम होलार बंधू आणि बहिणींना अतिशय नम्रपणे आवाहन करण्यात येते की आपला भारत देश स्वातंत्र्य झाल्यापासून ते आज अखेर होलार समाजाचा एक ही प्रश्न सुटलेला नाही त्याला अनेक कारणे असूशक्ततात. परंतु होलार समाजाचे प्रेरणास्थान श्री भगवान हरीबा जावीर गुरुजी व संस्थेचे संस्थापक अध्यक्ष नामदेवराव श्रीरंग आयवळे यांच्या अथक प्रयत्नामुळे होलार समाजाच्या जातीच्या चुकीच्या झालेली नोंद व त्यामुळे होलार समाजाला जातीचे प्रमाणपत्र व जातीचे वैधता प्रमाणपत्र मिळण्याकरिता होत असलेल्या अडचणी गेली अनेक वर्षे पासून भेडसावत आहेत त्या सोडविल्या जातील संस्थेसी संपर्क साधावा परंतु आपण स्वतः जिल्ह्याच्या ठिकाणी प्रोसेस करावी न दाखला मिळाल्यास जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीची प्रत पावती संस्थेला पाठवावी कारण आम्ही अपर जिल्हाधिकारी तथा विभाग प्रमुख प्रशिक्षण विभाग, बार्टी पुणे व सहा. आयुक्त समाज कल्याण व जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद गट विकास अधिकारी व उपविभागी अधिकारी व तहसीलदार महसूल विभाग यांच्याशी समन्वय साधून आपले प्रश्न निकाली काढण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार आहे याची नोंद समाज बांधवांनी द्यावी होलार समाज सामाजिक संस्था पुणे आपला विश्वासू नामदेवराव श्रीरगअयवळे संपर्क नंबर 97 64 96 90 74 या नंबर वर संपर्क साधावा
Popular Posts
-
-
होलार समाजासाठी विभागीय कार्यशाळा मोठ्या थाटामाटात संपन्न झाली – छत्रपती संभाजीनगरात बार्टी व होलार समाज संस्थेचा उपक्रम छत्रपती संभाजीनगर, 10 जुलै 2025 – डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अनुसूचित जाती वस्ती सुधार योजना (बार्टी), पुणे व होलार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय विभागीय कार्यशाळेचे आयोजन डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, खोकडपुरा, छत्रपती संभाजीनगर येथे करण्यात आले. ISO 9001:2015 प्रमाणित संस्थांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कार्यशाळेचा मुख्य उद्देश जात प्रमाणपत्र व जात पडताळणी प्रमाणपत्र संदर्भातील अडचणी, बेरोजगारी, उद्योग धोरणे व युवा गट स्थापनेविषयी समाजाला योग्य मार्गदर्शन समाज कल्याण विभागाच्या विविध योजना होलार समाजाच्या सामाजिक आर्थिक आणि शैक्षणिक अडचणी दूर करण्यासाठी सरकार, समाज, आणि स्थानिक प्रशासन यांच्याकडून समन्वय साधून विविध योजनेची अंमलबजावणी करणे हा कार्यशाळेचा उद्देश सामाजिक करणे हा होता. कार्यशाळेची सुरुवात थोर महापुरुषांच्या प्रतिमाचे मान्यवराच्या हस्ते पूजन करण्यात आले प्रमुख या कार्यक्रमासाठी मार्गदर्शक म्हणून बार्टी, पुणेचे अप्पर जिल्हाधिकारी व प्रशिक्षण विभाग प्रमुख, प्रकल्प व्यवस्थापक श्री. नितीन सहारे, सचिन नांदेडकर, संबंधित जिल्ह्यांचे उपविभागीय अधिकारी, कन्नड येथील प्रांत तहसीलदार, महसूल विभागाचे अधिकारी, जिल्हा जात पडताळणी समितीचे सदस्य, समाजकल्याण विभागाचे अधिकारी, तसेच बार्टी संस्थेतील विविध मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक बार्टीचे श्री. नितीनजी सहारे सर यांनी सादर केले. त्यांनी प्रकल्पाच्या उद्देशांबाबत सविस्तर माहिती दिली. बार्टीच्या विविध योजना समजावून सांगितल्या उपविभागीय अधिकारी व तहसीलदार महसूल विभाग यांनी जात प्रमाणपत्र प्रक्रिया व येणाऱ्या अडचणींचे सखोल विश्लेषण केले. जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी प्रक्रियेबाबत जिल्हा जात पडताळणी समिती, छत्रपती संभाजीनगर यांनी मार्गदर्शन केले. होलार समाजाचे संस्थापक अध्यक्ष श्री. नामदेवराव आयवळे यांनी समाजाच्या प्रमुख अडचणी अधिकार्यांच्या समोर प्रभावीपणे मांडल्या. व होलार समाजाच्या विकासासाठी बार्टी पुणे मार्फत विशेषतः विभागीय स्तरावरील स्वतंत्रपणे कार्यशाळा घेतल्या जात इतिहास घडत आहे मा. सुनील वारे महासंचालक यांना व सर्व टीमचे समाज बांधवांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. अनेक समाजबांधवांनी देखील आपले प्रश्न प्रत्यक्षपणे मांडले. या संवादातून अनेक शंका दूर झाल्या व उपाययोजना सुचविण्यात आल्या. कार्यक्रमाचा समारोप व आभारप्रदर्शन श्री. नितीनजी सारे यांनी केले. या कार्यशाळेमुळे होलार समाजातील नागरिकांना प्रशासनाशी थेट संवाद साधता आला तसेच जात पडताळणी आणि रोजगाराच्या संधींबाबत मोलाचे मार्गदर्शन मिळाले सर्व कार्यक्रमाला उपस्थित समाज बांधव पदाधिकारी यांना संस्थेच्या वतीने धन्यवाद
-