होलार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे (ISO 9001 : 2015 आंतरराष्ट्रीय गुणवत्ता व्यवस्थापन प्रणाली मानांकन प्राप्त संस्था) होलार समाज भूषण भगवान जावीर गुरुजी सहकारी पतसंस्था, पुणे (होलार समाज सामाजिक संस्था संचलित) लवकरच पुणे येथे “होलार समाज भूषण भगवान जावीर गुरुजी सहकारी पतसंस्था” स्थापन केली जाणार आहे. संस्थापक अध्यक्ष : श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे या पतसंस्थेची स्थापना करण्यामागचा मुख्य उद्देश — समाजातील लघु उद्योजक, व्यापारी व सामान्य नागरिकांना कमी व्याजदरात आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देणे. लघु व कुटीरोद्योगांना भांडवल पुरवून त्यांचा विकास साधणे. समाजातील गरीब व गरजू महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी विविध हस्तकला, गृहउद्योग, व कुटीरोद्योगाचे प्रशिक्षण देणे. प्रशिक्षण घेतलेल्या महिलांना स्वतःचा उद्योग उभारण्यासाठी पतसंस्थेमार्फत आर्थिक मदत उपलब्ध करून देणे. या उपक्रमांतर्गत पतसंस्थेची सभासद नोंदणी सुरू करण्यात आली आहे. वय वर्षे 18 पूर्ण असलेल्या सर्व इच्छुक सभासदांनी नोंदणीसाठी संस्थेशी संपर्क साधावा. संपर्कासाठी: 97 64 96 90 74 आपल्या समाजाच्या आर्थिक प्रगतीसाठी, स्वावलंबनासाठी आणि सर्वांगीण विकासासाठी या उपक्रमात सहभागी व्हा. “आपला सहकार – आपल्या समाजाचा आधार!” असे आव्हान श्री. बबनराव करडे नायब तहसीलदार सातारा तथा संस्थेचे सल्लागार. अँड.जी. एन. ऐवळे पुणे कायदे तज्ञ तथा संस्थेचे सल्लागार. श्री. अर्जुन खांडेकर संस्थेचे सचिव. श्री. जगन्नाथ पारसे खजिनदार.