होलार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे आय.एस.ओ. 9001 : 2015 प्रमाणपत्र प्राप्त – आंतरराष्ट्रीय गुणवत्ता व्यवस्थापन प्रणाली मानांकन होलार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे — ही अशा प्रकारची पहिली स्वयंसेवी संस्था (NGO) आहे, जिला ISO 9001:2015 हे प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय गुणवत्ता व्यवस्थापन प्रणालीचे प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. संस्थेने संपूर्ण ISO दस्तऐवज व नोंदपत्रे मराठी भाषेत तयार करून सादर केली, ही एक अभिमानास्पद बाब आहे. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे यांच्या दूरदृष्टी व मार्गदर्शनाखाली होलार समाजाने केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवरही आपली ओळख निर्माण केली आहे. या मानांकनाच्या प्राप्तीमुळे संस्था होलार समाज बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी, शिक्षण, रोजगार, सामाजिक बांधिलकी आणि सांस्कृतिक उन्नतीसाठी कटिबद्ध आहे. या प्रेरणेतून संस्था आगामी काळातही आपल्या समाजाच्या प्रगतीसाठी अधिक जोमाने कार्यरत राहील. आपले सहकार्य, आशीर्वाद आणि मार्गदर्शन भविष्यातही मिळत राहो, हीच संस्थेची मनापासून प्रार्थना आहे. – होलार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे (ISO 9001:2015 प्रमाणित – आंतरराष्ट्रीय गुणवत्ता व्यवस्थापन प्रणाली मानांकन प्राप्त संस्था)