होलार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे (ISO 9001:2015 आंतरराष्ट्रीय मानांकन प्राप्त संस्था) उपक्रमाची थोडक्यात माहिती: होलार समाज सामाजिक संस्था ही पुणे येथील एक मान्यताप्राप्त आणि ISO 9001:2015 प्रमाणित संस्था आहे. समाजात आर्थिक स्वावलंबन वाढवण्यासाठी आणि बेरोजगारी कमी करण्यासाठी ही संस्था विविध स्वरूपाचे व्यावसायिक उपक्रम राबवत आहे. उद्दिष्ट: "एकी हेच बळ, एकमेका साहाय्य करू, अवघे धरू सुपंथ!" ही भावना जपत संस्था समाजातील युवक-युवती, महिला बचत गट व स्वयंसेवी संस्था यांना छोट्या उद्योगासाठी प्रेरणा व पाठबळ पुरवते. मुख्य वैशिष्ट्ये: नोकरी करत असतानाच, रिकाम्या वेळेत स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची संधी कल्पना तुमची – प्रॉडक्ट आमचे – गुंतवणूक आमची – नफा तुमचा! व्यवसाय सुरू करण्यासाठी मार्गदर्शन, भांडवल, प्रशिक्षण आणि विपणन यामध्ये सहकार्य महिला बचतगट आणि इच्छुक व्यक्तींना विशेष प्राधान्य संपर्क करण्यासाठी: इच्छुक व्यक्तींनी किंवा महिला बचतगटांनी संस्थेशी थेट संपर्क साधावा. तुमची कल्पना, आमचं पाठबळ – चला एकत्र प्रगती करूया!