होलार समाज सामाजिक संस्था, पुणे. ISO 9001-2015 : 26-10-2024 : इतिवृत्त. 1.कलम 6.3 समजून घेतले. त्यात सांगितले आहे की "गुणप्र-बदल व्यवस्थापन गुणक" लिखित असावे म्हणजेच गुणप्रमधे कोणताही बदल कसा करावा ते कार्यपद्धती-गुणक लिहावे. 2.त्यात गुणप्रमधे बदल करताना काय काय विचारात घ्यावे व करावे त्याची योजना असावी. 3.त्यात बदल हेतू व संभाव्य परिणाम / जोखीम यांचा विचार व्हावा. 4.तसेच बदलासाठी आवश्यक संसाधन उपलब्धता विचार असावा. 5.त्यात कर्तव्य-अधिकार नेमणूक वा पुनर्नेमणुक याचा अंतर्भाव असावा. 6.त्यात गुणप्र एकात्मतेचा विचार असावा. 7.कोणत्याही बदलाचे गुणन राखावे. 8.कालबाह्य / कार्यबाह्य गुणमा राखायची का ते लिहावे. 9.ती कोणी राखायची व किती दिवस राखायची ते स्पष्ट लिहावे. 10.नंतर कालबाह्य गुणमा विल्हेवाट (उदा. (हाताने वा यंत्राने) फाडणे, जाळणे, पुरणे) कोणी व कशी लावायची ते ठरवावे.