https://holarsamajssp.blogspot.com/* *https://holarsamajsama jiksanstha.blogspot.com/* होलार समाज सामाजिक संस्था, पुणे. कार्यक्षेत्र महाराष्ट्र राज्य संस्थेच्या वतीनेकै. भगवान हरिबा जावीर गुरुजी यांच्या आत्म्याला शांती देवो म्हणून शोक सभेचे आयोजन दिनांक 1. 9. 2024 रोजी संस्थेचे मुख्य कार्यालय गणपत नगर बिबेवाडी पुणे येथे वेळ दुपारी 3 वा. आयोजित करण्यात येत आहे. तसेच होलार समाज भूषण समाजाचे प्रेरणास्थान कै. भगवान हरिबा जावीर गुरुजी हे दि.21.8.2024 रोजी आपणास सोडून गेले असले तरी त्यांचे विचार व त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आपण सर्व नातेवाईक समाज बांधव मित्र परिवार यांनी शोक सभेला वेळेत उपस्थित राहून सहकार्य करावे. तसेच. कै. भगवान हरिबा जावीर गुरुजी आपल्यामध्ये उपस्थित नाहीत, त्यांचे दुःख निधन झाले भगवान गुरुजी बद्दल ही गोष्ट समजली तेव्हा विश्वास बसला नाही. माझे मन भरून आले आणि डोळ्यातून पाणी आपोआप येऊ लागले. भगवान गुरुजी हे माझे गुरु होते ते होलार समाजाचे प्रेरणास्थान होते तसेच समाज भूषण होते त्यांचा स्वभाव मनमिळाऊ प्रेमळ होता. ते पटकन इतरांना मदत करणारे होते. आज त्यांच्या कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे त्यांच्या दुःखामध्ये मी माझे कुटुंब, होलार समाज सामाजिक संस्था सर्वजण सहभागी आहोत जो आवडे सर्वांना तोच आवडी देवाला. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो हीच प्रार्थना करण्यासाठी आपण सर्वजण उपस्थित राहून सहकार्य करावे होलार समाज सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य संस्थेचे सर्व पदाधिकारी सभासद समाज बांधव संपर्क 7972140451